Wednesday, February 12, 2025

PCMC : स्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने पूर्णनगर येथे जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पूर्णानगर, चिंचवड येथील स्त्री शक्ती फाउंडेशन वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. (PCMC)

पूर्णानगरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संस्थेच्या अध्यक्षा व योगशिक्षिका अर्चना सोनार या गेल्या अनेक वर्ष योग साधनेचे वर्ग चालवीत आहेत. जागतिक सूर्यनमस्कार दिन असल्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे तसेच श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सारिका रिकामे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

नारायण बहिरवाडे यांनी सूर्यनमस्काराचे अनेक फायदे सांगितले. रोज बारा सूर्यनमस्कार घातल्याने रक्ताभिसरण सुधारते, पचन संस्था सुधारते, तणाव कमी होतो, शरीर बळकट होते, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब इ. इत्यादी आजारावर नियंत्रण मिळवता येते. म्हणून प्रत्येकाने सूर्यनमस्कार दररोज करावे असे सांगितले. (PCMC)

सारिका रिकामे यांनी सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर असा व्यायामाचा प्रकार आहे, यामुळे अनेक व्याधी व आजारांना आपण दूर ठेवू शकतो. असे असे सांगितले.

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अर्चना सोनार यांनी प्रास्ताविकात योग वर्ग विषयी माहिती सांगितली.

या दिवसाचे औचित्त साधून सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. मोठ्या संख्येने योग वर्गात येणारे नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते. जोशी यांनी आभार मानले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles