वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने मिंडाच्या कर्तबगार कर्मचारी (MINDA चाकण) सोनाली शिंदे यांचा कौतुक समारंभ (PCMC)
एखाद्याचा सत्कार केल्यामुळे नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – मधुकर बच्चे
उद्योगामध्ये मुलींना मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त होतं आहेत – सोनाली मन्हास
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – सोनाली शिंदेचा प्रवास एक पदवीधर मुलगी ऑटो मोबाईल कंपनी मिंडा(स्विच) चाकण येथे ग्रुप लीडर असा आहे. सध्याच्या काळात नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे, सोनाली शिंदे हिने मिंडा(स्विच) मध्ये सुरवातीला लाईनवर एक सामान्य महिला कामगार म्हणून काम केलं. नंतर कंपनीच्या प्रॉडक्टिव्हिटी सुधारणा(improvement), टोटल क्वालिटी प्रोसेस, झिरो डीफेक्ट, औद्योगिक सेफ्टी मधील झिरो अपघात, टीपीएम, ई विविध उपक्रमात सोनालीने सहभाग घेऊन मागील चार वर्षात स्वतःचा कौशल्य विकास घडवला, आणि विविध पारितोषिके कंपनीत तिला मिळाली.
तसेच एम एस ऑफिस आणि सॉफ्ट स्किल विकास करण्यासाठी तिने स्वतः क्लास लावून नोकरी करत करत स्किल वाढवले त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने तिला पर्मनंट केले. हे तिच्या हार्ड वर्कचे प्रेरणादायी यश आहे. कौशल्य विकासातून प्रमोशन होते, वेतनात वाढ होते. भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनचा उद्देश सोनालीने यशस्वी केला आहे. (PCMC)
We together foundation
वुई टुगेदर फाउंडेशनच्या सदस्या आणि मिंडा कंपनीच्या कर्तबगार कर्मचारी सोनाली शिंदे यांचा सत्कार चिंचवड (दि. २ फेब्रुवारी) येथे करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे माजी अध्यक्ष सलीम सय्यद यांनी सांगितले की, कोरोना काळात अनेक कुटुंबे, विद्यार्थी आणि तरुण मुले मुली निर्बंध असल्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती सहन करत होते. आमची संस्था त्या काळात जीवनावश्यक वस्तू सह विविध प्रकारची मदत शहरात करत होती.
सोनाली शिंदे यांना त्या काळात आम्ही मदत केली. तिने २०२१ मध्ये ती संस्थेची सदस्य झाली. एम ए (सामाजिक शास्त्र) पदवीधर असल्यामुळे तिला कुठे काम मिळत नव्हते. कारण जे काही जॉब होते, ते सर्व औद्योगिक कंपन्यांमध्ये होते. संस्थेच्या मार्फत करिअर बदला कंपनीत काम करा. असा सल्ला देण्यात आला.
सुरवातीला तिने कंत्राटी कामगार म्हणून प्रोडक्शन लाईनवर काम केले. विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करून ती कंपनीत चार वर्षात एक कर्तबगार कामगार, ग्रुप लीडर म्हणून पर्मनंट झाली याचा आम्हाला अभिमान आहे, आज तिचा सत्कार आणि कौतुक करताना खूप आनंद होत आहे. असे सलीम सय्यद म्हणाले.
PCMC
वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सोनाली शिंदे यांचा चिंचवड येथे सत्कार आणि कौतुक समारंभ आयोजित केला होता.
यावेळी सोनाली शिंदे यांनी सांगितले की, कोरोना काळात संस्थेच्या सर्व लोकांनी आमच्या घरची चूल बंद पडू नये, म्हणून अन्नधान्य आणि इतर सर्व मदत केली. तो काळ खूप कठीण होता. त्यावेळी मी रोजगाराच्या शोधात विविध ठिकाणी फिरले, पण मला अपेक्षित संधी कुठेच मिळत नव्हती, मला कंपनीत काम करा असा सल्ला देण्यात आला.
त्यावेळी मिंडा चाकण येथे मी कंत्राटी कामगार म्हणून लाईनवर काम केले. मला कामाची खूप गरज होती. तसेच मला याच कंपनीत पर्मनंट व्हायचे स्वप्न होते. त्यावेळी मी कंपनीच्या विविध प्रकारच्या कामात सहभाग घेऊन टीम वर्क मध्ये सहभाग घेतला. माझ्या कंपनीतील सहकाऱ्यांनी मला प्रोत्साहन दिले. उत्पादकता वाढीसाठी प्रोडक्ट क्वालिटी सुधारण्यात आमच्या टीम ने विविध उपक्रम राबवले.
मी स्वतः बारा तास काम केले. त्यामुळे मला कंपनीत विविध पारितोषिके आणि ट्रॉफी मिळाल्या.आज मी माझ्या कंपनीत ग्रुप लीडर म्हणून पर्मनंट झाली आहे, माझ्या यशामध्ये वुई टुगेदर फाउंडेशनचे मोठे योगदान आहे. कंपनीत टीम वर्क मध्ये काम केल्यामुळे कौशल्य विकास होतो, आपल्या करिअर आणि नोकरीत सुवर्ण संधी प्राप्त होतात. असे सोनाली शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (PCMC)
एखाद्याचा सत्कार केल्यामुळे नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – मधुकर बच्चे
संस्थेचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी शाल, साडी, श्रीफळ,गुलाबाचे फुल देऊन ज्येष्ठ सदस्यांनी सोनाली शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मधुकर बच्चे म्हणाले की, सोनाली शिंदे सारख्या मुली आमच्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे, तिने कठीण काळात स्वतःची डिग्री बाजूला ठेऊन ऑटोमोबाईल मिंडा कंपनीत एक कंत्राटी सामान्य कामगार म्हणून कामाला सुरवात केली. कुटुंबातील आई वडील, भाऊ आणि स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी कंपनीत विविध जबाबदाऱ्या स्वीकारून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत सुधारणा करणाऱ्या टीम मध्ये अथक परिश्रम घेतले आहेत.
सध्याचा काळ मोठ्या स्पर्धेचा आहे, कंपनी व्यवस्थापन, ग्रुप लीडर्स आणि कामगार यांचे संयुक्त प्रयत्नातून कंपन्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होत असतात. त्यामुळे कामगारांचा पण उत्कर्ष होत असतो. ग्रुप लीडर्स हा कंपनीचा महत्वाचा घटक आहे. ग्रुप लीडर आणि टीम वर्क ही जपानी संकल्पना आहे. सोनाली शिंदे ग्रुप लीडर म्हणून पर्मनंट झाल्या याचा आनंद आहे शिवाय ती आमच्या संस्थेची सदस्य आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, तिच्या पुढील आयुष्यात शुभेच्छा व्यक्त करतो.
उद्योगामध्ये मुलींना मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त होतं आहेत – सोनाली मन्हास
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सोनाली मन्हास म्हणाल्या की, सोनाली शिंदेचा प्रवास एक पदवीधर मुलगी ऑटो मोबाईल कंपनी मिंडा(स्विच) चाकण येथे ग्रुप लीडर असा आहे. सध्याच्या काळात नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे, सोनाली शिंदे हिने मिंडा(स्विच) मध्ये सुरवातीला लाईनवर एक सामान्य महिला कामगार म्हणून काम केलं. नंतर कंपनीच्या प्रॉडक्टिव्हिटी सुधारणा (improvement), टोटल क्वालिटी प्रोसेस, झिरो डीफेक्ट, औद्योगिक सेफ्टी मधील झिरो अपघात, कायझेन, टीपीएम, ई विविध उपक्रमात सोनालीने सहभाग घेऊन मागील चार वर्षात स्वतःचा कौशल्य विकास घडवला, शिक्षण कोणतेही असले तरी रोजगाराच्या संधी मिळाल्यावर त्याचे सोने करणे म्हणजेच सोनाली शिंदे यांचा प्रवास आहे.
उद्योगामध्ये मुलींना अनेक संधी आहेत, त्यामुळे विविध पारितोषिके कंपनीत तिला मिळाली आहेत, तसेच एम एस ऑफिस आणि सॉफ्ट स्किल विकास करण्यासाठी तिने स्वतः क्लास लावून नोकरी करत करत स्किल वाढवले त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने तिला पर्मनंट केले. हे तिच्या हार्ड वर्कचे प्रेरणादायी यश आहे. कौशल्य विकासातून प्रमोशन होते, वेतनात वाढ होते. भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनचा उद्देश सोनालीने यशस्वी केला आहे. (PCMC)
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, उपाध्यक्ष सोनाली मन्हास, प्रभारी सचिव मंगला डोळे -सपकाळे सह मान्यवर सदस्य
श्रीनिवास जोशी, उल्हास दाते, सलीम सय्यद, दारासिंग मन्हास, विलास गटने, अनिल पोरे, दिलीप पेटकर यांनी सोनाली शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.