पिंपरी चिंचवड : आपल्या चिंचवडचे आराध्य गणपती मंडळ ‘चिंचवडचा राजा’ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही भव्य श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. (PCMC)
त्याचबरोबर अध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज संस्थानचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांची मिरवणूक व जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी चिंचवड, आळंदी, देहू, जेजुरी व कानिफनाथ मढी येथील धार्मिक संस्थानांचे प्रमुख विश्वस्त, आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सन्मानीय आमदार, स्थानिक नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. (PCMC)
१) मिरवणुक सुरवात स्थळ व वेळ – शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चिंचवडगाव जुनी पोलिस चौकी छत्रपती शिवाजी चौक ते चिंचवडचा राजा गांधीपेठ
२) महाआरती ‘चिंचवडचा राजा’ सायंकाळी ७ ते रात्री ७.३०.
३) जाहीर कार्यक्रम रात्री ७.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत चिंचवडचा राजा मंडप चौक गांधीपेठ
तरी वरील सर्व कार्यक्रमांमधे आपण सहकुटुंब सहभागी व्हावे अशी आपणांस ‘चिंचवडचा राजा’ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ परिवारातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आग्रहाची विनंती.
निमंत्रक
’चिंचवडचा राजा’ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ कार्यकर्ता परिवार
PCMC : चिंचवडचा राजा ‘श्री गणेश जयंती महोत्सव २०२५’ सस्नेह निमंत्रण
- Advertisement -