Wednesday, February 12, 2025

PCMC : श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न.

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कार्तिक लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली, नारायण बहिरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मकरंद टिल्लू (मोटीव्हेशनल स्पिकर) यांचे द्वारे हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा हा एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला. (PCMC)

सर्व प्रथम ज्येष्ठ नागरिक-संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके यांनी प्रास्तविक व ज्येष्ठ नागरिक संघाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी संघाची निर्मिती कशी झाली, व तसेच संघ आयोजित करीत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

नारायण बहिरवाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे समाजात असलेले महत्व विषद करून ज्येष्ठ हे आधारस्तंभ आहेत या विषयी मार्गदर्शन केले.

मकरंद टिल्लू यांनी आपल्या हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा या विनोदी कार्यक्रमाव्दारे आरोग्यासाठी हसणे कसे आवश्यक आहे यासंबंधी अनेक प्रात्यक्षिके सादर केली.

उपस्थितांकडूनसुद्धा अनेक कृती करून घेतल्या. त्यांच्या १ तासाच्या कार्यक्रमात कोणताही सदस्य जागेवरून हलला नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्तिक लांडगे यांनी आपल्या भाषणातून पाण्याचा वापर व महत्त्व या विषयी माहिती सांगितली. (PCMC)

तसेच श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघासाठी हक्काच्या स्वतंत्र सुसज्ज विरंगुळा केंद्राचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात येवून पुढील वर्धापन दिन, नविन विरंगुळा केंद्रात होईल अशी घोषणा केली.

तसेच या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघातील सहा सभासदांनी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करून त्यांना ट्रॉफी देण्यात आल्या.

त्यांची नावे पुढीलप्रमाणे – कैलासचंद्र सराफ, नामदेव नारखेडे, आझाद जोशी, कांचन नेवे, पुष्पा वाणी, मनीषा देव अशी आहेत.

या प्रसंगी प्रामुख्याने महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली मरळ, तसेच इतर अनेक जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सारिका रिकामे यांनी उत्कृष्ट निवेदिकेचे कार्य केले. शोभा नलगे यांनी सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, वारकरी मंडळ, युवा मंच, सेवेकरी मंडळी, महिला मंडळ यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राजू गुणवंत, दिलीप पाटील बिराजदार, नंदू भाऊ शिरसाट, उत्तरेश्वर, सौ. मंगल काळे, नीलिमा भंगाळे यांनी परिश्रम घेतले.

शेवटी सर्वांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles