पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅली निघणार (Alandi)
आळंदी (अर्जुन मेदनकर) : परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने होत असलेल्या पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळाव्याच्या निमित्तानं 31 जानेवारी रोजी पुणे ते सेलू अशी पत्रकार एकता रॅली निघणार असल्याची माहिती परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे. (Alandi)
एस.एम.देशमुख पत्रकार एकता रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.
31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता पुण्याजवळ पेरणे फाटयावरील शरद पाबळे यांच्या निवासस्थानापासून एकता रॅलीला सुरूवात होईल.
शिक्रापूर मार्गे रॅली रांजणगाव येथे पोहचेल.. तेथे स्वागत आणि दर्शन घेऊन रॅली शिरूर मार्गे अहिलयानगरला पोहोचेल. तेथे स्वागत आणि विश्रांती नंतर रॅली कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा मार्गे बीडला जाईल. वरील सर्व ठिकाणी स्थानिक पत्रकार आणि गावातील प्रतिष्ठित रॅलीचे स्वागत करतील.
बीड येथे रेस्ट हाऊसवर रॅलीचे स्वागत केले जाईल.. तेथून वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथरी मार्गे रॅली सेलू येथे पोहोचेल.. सेलूत स्वागताध्यक्ष आणि स्थानिक संयोजन समितीच्यावतीने रॅली आणि एस.एम.देशमुख यांचे स्वागत करण्यात येईल.
मार्गावरील तालुका जिल्हा संघाचे पदाधिकारी देखील रॅलीत सहभागी होतील.
रॅलीत विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत.
पत्रकारांच्या हक्कासाठी आणि चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठी निघत असलेल्या या रॅलीत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, प्रसिध्दी प्रमूख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन मेदनकर, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे आदिंनी केले आहे.