Maharashtra Police Bharti 2025 : राज्यात पोलिस दलात भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने 10,000 नवीन पोलिस पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच या पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या भरतीअंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत.
Police Bharti भरती प्रक्रियेस गती – गृह विभागाचे विशेष नियोजन
राज्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि पोलिस दलाचे मनुष्यबळ वाढवण्यासाठी ही भरती मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. मागील भरती प्रक्रियेत 17,000 पदांसाठी तब्बल 18 लाख अर्ज आले होते. यंदाही अर्जांची संख्या मोठी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही भरती पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी विशेष नियोजन सुरू आहे.
फिजिकल आणि लेखी परीक्षा
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर भर द्यावा. भरतीसाठी पुरुष उमेदवारांची उंची 165 सेमी, तर महिला उमेदवारांची उंची 155 सेमी असणे आवश्यक आहे. तसेच मैदानी चाचणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राज्यात नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी
राज्यातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये नवीन पोलिस ठाण्यांची गरज निर्माण झाली आहे. औद्योगिक क्षेत्रांमध्ये खंडणी, गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही पोलिस ठाण्यांची संख्या वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.
पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून, इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागावे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/Telegram-GIF.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 32,000 पदांसाठी मेगा भरती, पात्रता- 10 वी पास
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
मेगा भरती : भारतीय टपाल विभागा अंतर्गत तब्बल 25,000 पदांसाठी भरती होणार
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1267 पदांची भरती, असा करा अर्ज
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1124 पदांची भरती
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अंतर्गत भरती
वन विभाग नाशिक अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती
महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत 320 पदांची भरती
थेट इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी, शिक्षणाची अट नाही
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती होणार
स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीची तयारी कशी करावी?
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती