Tuesday, February 4, 2025

PCMC : एनआयपीएम मुळे व्यावहारिक ज्ञान, कौशल्यात सुधारणा – कल्याण पवार

पीसीयूमध्ये एनआयपीएम ची शाखा सुरू (PCMC)

पिंपरी चिंचवड ( क्रांतीकुमार कडुलकर) – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटची (एनआयपीएम) पिंपरी चिंचवड विद्यापीठातील शाखा मानव संसाधन व अन्य व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देईल. विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रमुख मानव संसाधन अधिकारी यांच्याशी व्यावसायिक संपर्क वाढविण्यास मार्गदर्शन व मदत करेल. या उद्योग प्रेरित उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळतील व व्यावहारिक ज्ञान, कौशल्यात सुधारणा होतील. ज्यामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढेल व स्पर्धात्मक जगात आणखी पुढे जाण्यास मदत होईल असे प्रतिपादन पीसीयु मधील एनआयपीएम चे अध्यक्ष कल्याण पवार यांनी केले. (PCMC)

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या शाखेमुळे बीबीए व एमबीएच्या विद्यार्थ्यांना करिअर साठी व्यावसायिक नेटवर्किंग, उद्योगातील अनुभव आणि प्रगतीसाठी अभूतपूर्व संधी मिळतील.

उद्घाटन प्रसंगी पीसीयूच्या कुलगुरू, डॉ. मनीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, कल्याण पवार (अध्यक्ष), डॉ. कीर्ती धारवाडकर (उपाध्यक्ष), ॲड. प्रशांत क्षीरसागर (अतिरिक्त सचिव), सतीश पवार, किशोर केंचे, पवन शर्मा व वहीदा पठाण (कार्यकारी समिती सदस्य), स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्रमुख, डॉ. अमित पाटील, समन्वयक डॉ. दीप्ती शर्मा व डॉ. सोनम सिंग आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी प्रास्ताविक करताना सांगितले की, अशा उपक्रमांतून करिअरसाठी व्यावसायिक नेटवर्किंग वाढवता येईल.

प्र-कुलगुरू, डॉ. सुदीप थेपडे म्हणाले की, स्पर्धात्मक बाजारात पुढे जाण्यासाठी एनआयपीएम मार्गदर्शकाची भूमिका करेल.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कर्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles