Tuesday, February 4, 2025

PCMC : श्री गणेश जन्मोत्सव निमित्त चिंचवड मध्ये अखंड हरिनाम सप्ताह

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यंदाचा १९ वे वर्ष असल्याचे माहिती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे सचिव शिवानंद चौगुले यांनी दिली. (PCMC)

आकुर्डी-चिखली मार्गावरील पेठ क्रमांक १८, महात्मा फुलेनगर येथील श्री गणेश मंदिरात २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला होत आहे.

यानिमित्त विना, कलश व ग्रंथ पूजन, हभप भरत महाराज चेढे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी’श्रीं’ची महापूजा, काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, हरी कीर्तन व हरी जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

या शिवाय किर्तनकारांची कीर्तन सेवा दररोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे. प्रजासत्ताक दिनी हभप बबन महाराज खेकाळे, गायत्रीताई थोरबोले,संतोष महाराज ताजणे, दयानंद महाराज पुरी,गोरक्षनाथ महाराज साठे,धर्मराज महाराज हांडे, वैजनाथ महाराज वस्तूरे व डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबा देसाई यांनी दिली.

PCMC

दरवर्षीप्रमाणे श्री गणेश जन्मोत्सव, श्री गायत्री गणेश याग व ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहाने साजरा करणार असल्याचे हभप सुनील महाराज गाडे यांनी सांगितले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles