Bhandara : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 ते 7 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी बचावकार्य सुरू करत कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
सकाळी साधारणतः 11 वाजता कंपनी परिसरात मोठा स्फोट झाला, ज्यामुळे परिसर हादरला. या भीषण आवाजामुळे स्थानिक नागरिक घाबरून घराबाहेर आले. स्फोटाच्या ठिकाणी मोठा जमाव जमला. हा स्फोट आर के ब्रांच सेक्शनमध्ये झाला असल्याचे समोर आले आहे, जिथे कर्मचारी काम करत होते. स्फोटामुळे कंपनीतील 8 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर तातडीने उपचार सुरू (Bhandara)
जखमींना तत्काळ भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाच्या संभाव्य धोक्यामुळे कंपनीचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट नाही
या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, साठवलेल्या स्फोटक पदार्थांच्या हाताळणीदरम्यान ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि प्रशासन या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
राज्य सरकारची प्रतिक्रिया
या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, भंडारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ
थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित