Tuesday, February 4, 2025

मोठी बातमी : सामान्य नागरिकांना महागाईचा झटका ; बस, टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात वाढ

Travel inflation : नवे वर्ष 2025 सुरू होताच महाराष्ट्रातील प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एसटी (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ), टॅक्सी, आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात लक्षणीय वाढ (ST Bus Ticket Hike) जाहीर करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने 14.95% तिकीट दरवाढीला मंजुरी दिली असून, हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे.

एसटी तिकीट दरवाढ का झाली? (Travel Inflation)

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामध्ये इंधनाचे वाढलेले दर, कर्मचाऱ्यांचे पगार आणि सुटे भागांच्या किमतींच्या वाढीचा संदर्भ दिला आहे. या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.

टॅक्सी-रिक्षाच्या भाड्यातही वाढ

एसटीच्या दरवाढीनंतर मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनीही 1 फेब्रुवारीपासून भाडेवाढ लागू करण्याची मागणी केली आहे. नवीन भाडेवाढीनुसार, रिक्षा भाडे किमान 23 रुपयांवरून 26 रुपये, टॅक्सी भाडे किमान 28 रुपयांवरून 31 रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अधिक खर्च करावा लागणार आहे.

सर्वसामान्यांवर परिणाम

या सर्व भाडेवाढीचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. एसटी तसेच टॅक्सी आणि रिक्षा या सार्वजनिक वाहतुकीच्या मुख्य साधनांमुळे लाखो नागरिकांना अधिक खर्च करावा लागेल.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ

‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

Related Articles

- Advertisement -

Latest Articles