मुंबई (वर्षा चव्हाण) : सात वर्षे जुन्या या प्रकरणात ‘श्री’ या कंपनीने वर्माच्या फर्मविरुद्ध धारा 138 अंतर्गत केस दाखल केली होती. मंगळवारी मुंबईतील एक न्यायालयाने चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांना चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवून तीन महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा सुनावली.
यापूर्वी २०२२ मध्ये त्यांना पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. आता न्यायालयाने त्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणाची सुरूवात सात वर्षांपूर्वी झाली होती, ज्यामध्ये ‘श्री’ नावाच्या कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली वर्माच्या फर्मविरुद्ध धारा 138 अंतर्गत केस दाखल केली होती.
Ram Gopal Varma यांना कोर्टाने दोषी ठरवले
अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने वर्मा यांना दोषी ठरवले आणि त्यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा दिली. तसेच, वर्माला तीन महिन्यांच्या आत 3.72 लाख रुपयांची भरपाई तक्रारदाराला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ही भरपाई दिली नाही, तर वर्माला आणखी तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा होईल.
वर्मा न्यायालयीन कारवाईत अनुपस्थित होते, म्हणून न्यायालयाने त्यांची अटकेत अटक करण्यासाठी एक नॉन-बेलिबल वॉरंट जारी केले आणि संबंधित पोलिस स्थानकाला त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की वर्मा यांनी खटल्यादरम्यान कोणतीही वेळ कारावासात घालवलेली नाही, व कोर्टात नियमीत गैरहजर राहिल्याने त्यामुळे भारतीय दंडसंहिता कलम 428 अंतर्गत कोणतीही सवलत मिळणार नाही.
न्यायालयाच्या निर्णयावर वर्मा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, हे प्रकरण त्यांच्या पूर्व कर्मचारी द्वारा दिलेल्या ₹2,38,000 च्या चेक संबंधी आहे. त्यांनी म्हटले की, त्यांच्या कायदेशीर टीमने या प्रकरणाचे निराकरण केले आहे आणि या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे, म्हणून त्यांना आणखी काही सांगता येणार नाही.
“अंधेरी कोर्टात माझ्या बाबतीत आलेल्या बातम्या संदर्भात, मी स्पष्ट करू इच्छितो की, हे 7 वर्ष जुन्या ₹2,38,000 च्या रक्कमेच्या चेकशी संबंधित प्रकरण आहे, जो माझ्या पूर्व कर्मचारीने दिला होता. माझ्या वकिलांची टीम यावर काम करत आहे आणि हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी यावर अधिक काही बोलू शकत नाही,” असे त्यांनी X वर पोस्ट केले.
महत्वाचे म्हणजे, ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’ आणि ‘सरकार’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या रामगोपाल वर्मा यांची कारकीर्द गेल्या काही वर्षात संपुष्टात आली आहे. बॉक्स ऑफिसवर त्यांचे चित्रपट गाजत नसल्यामुळे वर्मा यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर, याच आर्थिक अडचणीमुळे त्यांना आपले ऑफिस विकावे लागले होते. आता पुन्हा त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
हे ही वाचा :
थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित