Mumbai : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून तीन कामगारांनी मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात घडली आहे. या भयंकर घटनेत मालक सय्यद फैसल हुसेन (वय 42) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा साथीदार तौसिफ गंभीर जखमी झाला आहे. सध्या तौसिफवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळफाटा परिसरातील खान कंपाऊंडमध्ये एक चायनीज कॉर्नर चालवणारे सय्यद फैसल हुसेन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या तीन कामगारांना चोरी करताना पकडले होते. या प्रकारामुळे फैसल यांनी त्यांना कामावरून काढून टाकले होते. कामगारांनी त्याचा राग मनात ठेवून फैसल यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
प्राणघातक हल्ला (Mumbai)
वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त कामगारांनी धारदार शस्त्राने फैसल आणि त्यांच्या साथीदार तौसिफवर हल्ला केला. या हल्ल्यात फैसल यांचा जागीच मृत्यू झाला. तौसिफ गंभीर जखमी अवस्थेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शिळफाटा परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित