Crime News : रांजणगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा पायाने दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात वैजापूर न्यायालयाने आरोपी आनंद सुरेश लोखंडे (२५) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी आनंद लोखंडे याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. संशयातून रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीचा गळा पायाने दाबून तिचा जीव घेतला. ही घटना २० जुलै २०१९ रोजी घडली होती. या क्रूर घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाचा निर्णय
वैजापूर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी आनंद लोखंडेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर (Crime News)
कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
हे ही वाचा :
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित