Monday, February 3, 2025

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, वृद्ध महिलेचा मृत्यू; सहा जण जखमी

Samruddhi Highway : महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. नागपूर येथील लग्न समारंभ आटोपून वाशीमला परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

हिग्ना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर, वेणा नदीवरील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात कारमधील 67 वर्षीय आशा देवी रमेशचंद्र लाहोटी यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य सहा जण गंभीर जखमी झाले.

जखमींची नावे आणि प्रकृती (Samruddhi Highway accident)

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये चालक रोहित लाहोटी, त्याची पत्नी टिळक लाहोटी (वय 32), रोशन लाहोटी (वय 35), विठ्ठल राठी (वय 45), दिनेश मालानी (वय 38) आणि त्यांची पत्नी सुनीता (वय 38) यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सध्या नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ

‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या

मोठी बातमी : आगीच्या अफवेमुळे प्रवाशांच्या धावत्या रेल्वेमधून उड्या, समोरच्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

Related Articles

- Advertisement -

Latest Articles