पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या लगत प्राचीन महादेव मंदिर आहे, सुरक्षेचा दृष्टीने तेथे महापालिकेच्या वतीने सीमाभिंत बांधण्यात आलेली आहे. (PCMC)
माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी या सीमाभिंतीच्या कामाचा वेळी पाहणी करताना संबंधित मनपा अधिकारी व सल्लागार, ठेकेदार यांना या भिंतीवर सुशोभिकरण करण्याऐवजी प्राचीन महादेव मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात तसेच महाशिवरात्री निमित्त मोठा उत्सव येथे भरतो, महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मंदिरात येथे येत असतात, त्यामुळे या प्राचीन महादेव मंदिर परिसरास शोभेल असे या सीमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्यात यावे अशा सूचना केल्या होत्या.
PCMC
या कामासाठी नाना काटे यांनी वेळोवेळी महापालिका यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यास यश म्हणून या सिमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्याचा कामास सुरुवात करण्यात आली असून महाशिवरात्री उत्सवापूर्वी हे शिल्प बसविण्याचे काम पूर्ण होईल असे मनपा अधिकारी ठेकेदार यांचा वतीने सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा :
थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित