पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – वुई टुगेदर फाउंडेशनचे कार्यकारीणी सभासद खुशाल दुसाने यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या एल्प्रो मेट्रोपोलीस या चिंचवड लिंक रोड येथील सोसायटीतील सदस्यांनी त्यांच्याकडे वापरात नसलेल्या सुमारे आठ सायकली आपल्या संस्थेला गरीब मुलांना शाळेत जाण्यासाठी दान केल्या आहेत. (PCMC)
सदर कार्यक्रमाला या सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल भोईर, शंकर गावडे, वाळके व इतर सीनियर सिटीजन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वुई टुगेदर फाउंडेशनचे (WE TOGETHER FOUNDATION) अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी आपल्या संस्थेच्या वतीने सदर सोसायटीतील मान्यवरांचे आभार मानले. तसेच संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य उल्हास दाते यांनी थोडक्यात आपल्या संस्थेविषयी तेथील सदस्यांना चांगली माहिती दिली. आपल्या संस्थेचे कार्य ऐकून तेथील सदस्य अशोक नहार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या संस्थेला रुपये 1000 देणगी दिलेली आहे.
PCMC
तसेच तेथील एफ बिल्डिंग मधील सोसायटीचे सदस्य व महानगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करताना या पुढील काळात जी काही शक्य असेल ती मदत मी पुढील महिन्यात 20 एप्रिलला माझा वाढदिवस आहे, त्याप्रसंगी देईन, असे सांगितले व शंकर गावडे यांनी त्यांच्या रोटरी क्लब तर्फे जर संस्थेकडे एखादा प्रोजेक्ट असेल तर तो पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब कडे पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले.
याप्रसंगी तेथील रहिवासी व आपले सदस्य रविन्द्र शेटे यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला आपले सदस्य मधुकर बच्चे, मंगला डोळे – सपकाळे, जयंत कुलकर्णी, दारासिंग मन्हास, बाळासाहेब जगताप, अर्जुन गावडे, विजय केसकर, उल्हास दाते, श्रीनिवास जोशी व सलीम सय्यद उपस्थित होते.