शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा निर्णय पाठिंबा (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाच्या जागेच्या भूमिपूजनाच्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ०१ फेब्रुवारी 2025 च्या अगोदर ठोस निर्णय न घेतल्यास सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने रक्त लिखित पत्र व्यवहार 06 फेब्रुवारी 2025 पर्यंत करणार त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक निर्णय भूमीपुजनाच्या संदर्भात न घेतल्यास तीव्र आंदोलन करून भुमीपुनचा निर्णय घेतला जाईल. (PCMC)
या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा सकल मातंग समाज प्रदेश समन्वय तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे. (PCMC)
यावेळी शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, रिलस्टार लहुसैनिक ऋषिकेश वाघमारे, शिवाजी माने, शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिल तांबे, भोसरी विधानसभा अध्यक्ष मारुती काळे, संस्थापक / अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, वंचित बहुजन आघाडी आंदोलन कर्ते राजेंद्र साळवे, दिपक भालेराव,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.