Wednesday, January 15, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये विविध कार्यक्रम संपन्न

PCMC : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये विविध कार्यक्रम संपन्न

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा ज्युनिअर कॉलेज व प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न झाले. (PCMC)

कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात जिजाऊ माता जयंती व युवा दिन साजरा करण्यात आला प्रमुख वक्त्या विदुला पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा खजिनदार डॉ. भूपाली शहा उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे डॉ. सुनीता पटनायक प्रा. वैशाली देशपांडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी केले तर आभार प्रा. सुरेखा कुंभार यांनी मानले.

प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ओंकार कोचरेकर यांनी स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान केली तर माजी विद्यार्थिनी माधुरी धोत्रे हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनपटावर आधारित एक पात्री प्रयोग सादर केला त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (PCMC)

भूगोल दिन व मकर संक्रांति निमित्त प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी संक्रांतीच्या सण विविध राज्यात कसा साजरा केला जातो यासंदर्भात पारंपारिक वेशभूषा करून त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखन संस्कृती रुजावी यासाठी वक्त्या प्रा. सुरेखा कुंभार यांनी बीएडच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक वर्गांना सामूहिक वाचन संकल्प प्रतिज्ञा शपथ स्वरूपात देण्यात आली.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पौर्णिमा कदम समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड विभाग प्रमुख प्रा. मनीषा पाटील यांच्या उपस्थितीत बी एडच्या माजी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला सन 2009. बॅचपासूनचे माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. विशेष प्राविण्य मिळविणारे तसेच विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध मान्यवराच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले, विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा गीता कांबळे, प्रा. पल्लवी चव्हाण, डॉ. संतोष उमाटे, ग्रंथपाल महेश दुशिंग, प्रा. अस्मिता यादव, प्रा हर्षदा जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार सुशील भोंग यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ग्राहकांसाठी खूशखबर : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल, 40-70% पर्यंत सूट

महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

पुण्यात विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी, कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

सुंदर स्टेटस ठेवला अन् काही वेळातच भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

‘सारथी’मार्फत तरुणांना वाहनचालक प्रशिक्षण, 10 हजार विद्यावेतन मिळणार

संबंधित लेख

लोकप्रिय