Wednesday, February 12, 2025

PCMC : विवेकानंद जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबीर

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथे मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर मोफत चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)

या शिबिरामध्ये 200 नागरिकांची नेत्र तपासणी केली. 45 रुग्णांचे मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

लाइफ लाईन ब्लड सेंटर या रक्तपेढीसाठी 50 जणांनी रक्तदान केले . या रोटरी क्लबचे संतोष गिरंजे, रोहन रोकडे, डॉ प्रीती भळकट, एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय डॉ.दराड , प्रतिष्ठानचे देवराम मेदनकर, महादेव कवितके, राजेश चित्ते उपस्थित होते. (PCMC)

कार्यक्रमाचे संयोजन स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे रामराजे बेंबडे, महेश मांडवकर, मिलिंद वेल्हाळ, अशोक हाडके, आर के पाटील, हंबीरराव भिसे, शंकर बनकर, संतोष ठाकूर यांनी केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles