Wednesday, February 5, 2025

Alandi : एकादशी दिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी, श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील पुत्रदा एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. (Alandi)

मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. आळंदी ग्रामस्थ व महिला भाविक यांनी इंद्रायणी आरतीस एकादशी दिनी प्रतिसाद देत हरिनाम गजरात आरती केली.
आळंदी मंदिरात भाविकांनी पुत्रदा एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. इंद्रायणी आरतीस महिला भाविकांचा प्रतिसाद मोठा होता.

यावेळी आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने आदी उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून दर्शन घेतले. दुपारचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री धुपारती, संतोष मोझे सरकार यांचे वतीने हरिजागर सेवा रुजू झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली. राज्यातून आलेल्या भाविकांनी श्रींचे दर्शन घेत मंदिरात प्रदक्षिणा केली.

यावेळी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने आदींनी भाविकांसी संवाद साधला. आळंदी येथील श्रींचे दर्शन घेत अनेक भाविक देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यास रवाना झाले.

आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस देखील गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी परिश्रम घेतले.

यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सुरळीत वाहतुकीचे तसेच बंदोबस्ताचे नियोजन केले.

आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे प्रभावी नियोजन आवश्यक असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले. यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून राहत मिळेल. यावेळी आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनास सुरळीत वाहतुकीसाठी सहकार्य केले.

अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती
आळंदी ग्रामस्थ, इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.

एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील, गोविंद ठाकूर तौर, अनिता शिंदे, कौसल्या देवरे, पुष्पा लेंडघर, शैला तापकीर, राणी वाघ, सुरेखा कुऱ्हाडे, सरस्वती भागवत, नीलम सुनीता कोठावडे, अनिता जंगले, सरला भागवत, विमल मुसळे, शोभा पाटील, सुनीता मोरे, प्रतीक्षा हनवते आदींसह भाविक उपस्थित होते. (Alandi)

इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले.


Alandi

इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन गणपतराव कुऱ्हाडे पाटील यांनी केले. इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी संयोजन केले. आळंदी इंद्रायणी नदी घाटाचे पावित्र्य जोपासण्यास मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देण्यात येत असल्याचे राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी सांगितले.

मान्यवरांचे हस्ते इंद्रायणीची आरती नंतर पसायदानाने उपक्रमाची सांगता झाली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ

तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू

पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्टर

Jio च्या ‘या’ स्वस्तातील रिचार्ज प्लॅनमध्ये 12 ओटीटी आणि अमर्यादित 5 जी डेटा

आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत

आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

Related Articles

- Advertisement -

Latest Articles