नाशिक : ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल होत चालला आहे. मुलांची लग्नाची वय निघून चालली असतानाही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही. मुलांच्या वाढत्या वयामुळे आई वडील प्रचंड तणावात असतात. मात्र, नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मुलासाठी सुन बघायला गेला अन् स्वतःच नवरदेव झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Nashik News)
लग्नासाठी गेलेल्या वडिलांचा धक्कादायक निर्णय (Nashik)
नाशिकमधील सिडको भागात एका तरुणाच्या लग्नासाठी त्याचे वडील मुलगी पाहण्याच्या उद्देशाने गेले होते. कुटुंबासाठी ही एक आनंददायक घटना ठरावी, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, ही भेट त्यांच्या कुटुंबासाठी शोकांतिका ठरली. त्या वडिलांनी स्वतःच त्या मुलीशी पळून जाऊन लग्न केले.
मुलाला एक स्थळ सांगुन आले होते. मुलाला मुलगी पसंद पडली होती. त्या दोघांचा साखरपुडाही झालेला होता. मात्र दरम्यान, त्या मुलाच्या वडिलांचे आणि मुलीचे सुत जुळले आणि मुलांचे घर बसण्या आधीच बापाने मुलीसोबत लग्न केले.
या घटनेचा मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. वडिलांवर असलेला विश्वास आणि त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. या धक्क्याने तो नैराश्याने पछाडला आहे. रस्त्यावर अस्वस्थपणे फिरत, स्वतःशी बोलत असल्याचे स्थानिकांचे मत आहे. या संतापजनक घटनेने नात्यांच्या बंधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हे ही वाचा :
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ
तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू
पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्टर
Jio च्या ‘या’ स्वस्तातील रिचार्ज प्लॅनमध्ये 12 ओटीटी आणि अमर्यादित 5 जी डेटा
आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत
आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार