Wednesday, February 5, 2025

PCMC : नवीन वर्षाची सुरुवात भारत स्वच्छतेने

सामाजिक कार्यकर्ते कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशन यांचा अभिनव व अनुकरणीय उपक्रम (PCMC)

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच नवीन वर्षाचा संकल्प म्हणून कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडेशन यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील थोर महापुरुष त्यांचे स्मारक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (PCMC)

नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टी फिरायला जाणे अशा प्रकारचे नियोजन करत असतात त्यातूनच एक आगळावेगळा असा उपक्रम कीर्ती मारुती जाधव या फाउंडेशनचे मार्फत सुरू करण्यात आलेला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आव्हान करण्यात आलेला आहे की, महिन्यातून किमान एकदा तरी थोर महापुरुषांचे स्मारक स्वच्छता मोहीम राबवून शहरातील सर्व नागरिकांना एक स्वच्छतेचे संदेश द्यावा असे विनंती करण्यात आली.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती जाधव, महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर यशवंत कन्हेरे, युवराज दाखले, बाबू पाटोळे, नाना कांबळे, पांडुरंग पाटोळे, विलास रूपटक्के, गणपत जाधव, धनंजय जाधव, प्रीतम एडके, बाळू भवाळ, रितेश कुचेकर, अभिषेक कदम, सागर मस्के, गणेश मस्के, सेफ खान, निखिल आरणे, सचिन मुरगुंड, अगस्ती घोडके यांनी सहभाग घेतला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles