विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याशी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा
जालना : आज दि. १६ मार्च २०२१ रोजी तालुक्यातील अतिरिक्त उसप्रश्न, विजप्रश्न आणि पीकविमा व इतर काही शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभा घनसावंगी तालुका कमिटीच्या वतीने घनसावंगी तहसील कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला, सर्व परिसर घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी जिल्हाधिकारी विजय राठोड हे घनसावंगी दौऱ्यावर असताना त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांनी अतिरिक्त उसप्रश्न, प्रलंबित पीक विमा आणि वीज बिल प्रश्न सोडवण्यासाठी शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व मागण्या लक्षात आल्या असून लवकरच त्याची सोडवणूक करू असे आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार; डोंगरी भागात शिक्षकांची नियुक्ती करणार
माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक वॉक-वे, पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल
यावेळी निदर्शनास किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. गोविंद आर्दड बोलतांना म्हणाले, सरकारवर जोरदार टीका करत त्यांनी किसान सभा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी लढणार आणि यांना न्याय मिळवून देणार.
यावेळी किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. अंशीराम गणगे, तालुका सचिव कॉ. वैभव कराळे यांनी संबोधित केले. निदर्शनास sfi च्या वतीने अजित पंडित यांनी पाठींबा देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी सोबत राहू असे आश्वासनं दिले.
यावेळी आसारामजी आर्दड, बालासाहेब राऊत, बजरंग तौर, जनार्दन भोरे, कुलदीप आर्दड, ज्ञानेश्वर लहाने, अप्पासाहेब काकडे, अमोल काळे यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात पुन्हा एल्गार, 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभरात आंदोलनाची घोषणा