जुन्नर / आनंद कांबळे : तीन वर्षापूर्वी दिलेल्या बातमीचा राग मनात धरून पत्रकार संदीप उत्तर्डे यांना मोबाईल वरून शिवीगाळ करून दमदाटी केल्या करणारे तथाकथित समाजसेवक अक्षय बोऱ्हाडे (Akshay Borhade) यांचेवर कारवाई करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी काळ्या फीत लावून जुन्नर शहरातून मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला. (Junnar)
दरम्यान, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली. यावेळी चौधर म्हणाले कि, अक्षय बोऱ्हाडे हा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. निश्चितच त्याच्यावर योग्य त्या कलमांद्वारे कारवाई करण्यात येईल. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई होत असेल तर सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेऊन त्या कलमाद्वारे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पत्रकार बांधवाना दिले. यावेळी जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर हे उपस्थित होते.
तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अक्षय बोऱ्हाडे (Akshay Borhade) यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना पती बोऱ्हाडे याचेवर बाहेरख्यलीपणाचे पुरावे देत, आपली हि छळवणूक कशी केली याचीही माहिती दिली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तो व्हिडिओ जाहीर केला होता. तीन वर्षानंतर या घटनेचा राग मनात धरून अक्षय बोऱ्हाडे याने संदीप संदीप उत्तर्डे यांना शिवीगाळ करत दोन-तीन दिवसात मी काय करतो हे बघच अशी धमकी दिली होती. यासंदर्भात संदीप उत्तर्डे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध फिर्याद दिलेली आहे. अक्षय बोऱ्हाडे याने पत्रकार संदीप उत्तर्डे यांना दिलेल्या धमकी प्रकरणी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी जुन्नर येथे काळे फीत लावून जुन्नर शहरातून मोर्चा काढला. जुन्नर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांना निवेदन देऊन अक्षय बोऱ्हाडे यांचे कडक कारवाई करून तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
यावेळी पत्रकार सचिन कांकरिया, संजय थोरवे यांनी पत्रकार संदीप उत्तर्डे यांना धमकी देऊन शिवीगाळ करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे याचेवर कारवाई करावी यावी अशी मागणी केली. या मोर्च्यात, जेष्ठ पत्रकार रवींद्र कोल्हे, सचिन कांकरिया, किरण वाजगे, संजय थोरवे, अरुण मोरे, सुरेश वाणी, अण्णा भुजबळ, संजोग काळदंते, रमेश तांबे, पराग जगताप, मंगेश पाटे, नितीन गाजरे, किरण साबळे, अमोल गायकवाड, पवन गाडेकर, नितीन ससाने, फल्ले, महेश घोलप, मनोहर हिंगणे, अमर भागवत, राजेश कणसे, अशपाक पटेल, अभिषेक वामन, काका जाधव, सोनू गाडे, अशोक डेरे, कैलास बोडके तसेच, जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ, जुन्नर तालुका पत्रकार संघ, शिवजन्मभूमी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
(Junnar)
हे ही वाचा :
पुणे महानगरपालिके अंतर्गत 179 पदांसाठी भरती ; विनापरीक्षा भरती
लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले वाचा !
‘मराठी माणसं भिकारी आहेत’ म्हणत कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला
बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस रणरागिणीने दिला चोप
IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी
कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती