Wednesday, February 12, 2025

Pune : बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस रणरागिणीने दिला चोप (Video)

Pune : पुणे शहर सिटी बसमध्ये(PMPML) मद्यधुंद होऊन महिलेची छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला वैतागलेल्या महिलेने बसमध्येच अर्धा तास चोप दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. (Pune)

सदर महिला शिक्षिका असून आपल्या मुलासमवेत सिटी बसमधून प्रवास करत होती.
मद्यधुंद व्यक्ती त्याच बस मध्ये प्रवास करत असताना महिलेला अयोग्यजागी स्पर्श करत सतावत होता. अखेर महिलेने त्या मद्यधुंद व्यक्तीची कॉलर पकडून थोबाडीत द्यायला सुरवात केली, सुमारे २१ वेळा महिला शिक्षिका त्या व्यक्तीची पिटाई करत होती.

ही घटना घडत असताना बसमधील प्रवासी शांतपणे हा प्रकार पाहत होते, कोणी त्या महिलेला मदत करत नव्हते, बसमध्ये मद्यधुंद व्यक्तींना प्रवेश देणे बंद केले पाहिजे. अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया समाज माध्यमावर व्यक्त केल्या जात आहेत, आणि सदर महिलेचे कौतुक केले जात आहे.

हा सगळा प्रकार घडल्यानंतर बस सहित संबंधित व्यक्तीला पुण्यातील शनिवारवाडा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, तेथे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Pune)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

पुणे महानगरपालिके अंतर्गत 179 पदांसाठी भरती ; विनापरीक्षा भरती

लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले वाचा !

‘मराठी माणसं भिकारी आहेत’ म्हणत कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला

बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस रणरागिणीने दिला चोप

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

Related Articles

- Advertisement -

Latest Articles