Friday, December 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : मरकळ पंचलिंगमाळावर दत्तजन्मोत्सवास प्रारंभ अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन

Alandi : मरकळ पंचलिंगमाळावर दत्तजन्मोत्सवास प्रारंभ अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन

आळंदी / अर्जुन मेदनकर : श्रीक्षेत्र मरकळ (मारूतीनगर ता.खेड ) येथील जागृत, पुरातन पंचलिंगमाळावरील दत्तमंदिरात टाळ-मृदंगाच्या गजरात श्री दत्त जन्मोत्सवा निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा ह.भ.प. ताईमाऊली महाराज यांचे मार्गदर्शनात सोहळ्यास प्रारंभ झाला. या निमित्त पंचक्रोशीतील भाविक, नागरिकांना हरिकीर्तन सेवेच्या श्रवणाची पर्वणी लाभणार आहे. (Alandi)

पंचलिंग गुरुदेव दत्त प्रतिष्ठानच्या वतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या सप्ताहाचे उद्घाटन विविध उपक्रमांनी झाले. सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी पंचलिंग देवस्थान अध्यक्ष ताई माऊली महाराज, मी सेवेकरी फाउंडेशन अध्यक्ष सुधीर मुंगसे, पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास महाराज बालवडकर, सरपंच चंदनशेठ मुऱ्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अनुराग जैद, संचालक संतोष कुंभार, मरकळ उपसरपंच सतीश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास लोखंडे, विद्यमान सरपंच बाजीराव लोखंडे, विद्यमान चेअरमन बाळू टाकळकर, गोरक्ष महाराज वर्पे, पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष भगवानशेठ पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य आळंदी शहराध्यक्ष राहुलशेठ चव्हाण, पत्रकार महादेव पाखरे, अनिल जोगदंड, राजेश नागरे, अर्जुन मेदरकर, गोविंद ठाकूर तौर, देवस्थान सदस्य संभाजी ज्ञानोबा लोखंडे, किरणशेठ लोखंडे, संतोष कुंभार, हिरामण लोखंडे, मयुर चव्हाण, सतिश लोखंडे, भानुदास लोखंडे, शंकर वरपे, हनुमंत आव्हाळे, पंडित बिराजदार, हनुमंत आदलकार, पुजारी स्वामी सूर्यवंशी, लक्ष्मण नेटके, कैलास होले, शिवाजी शंकर मोशेरे, आळंदी शहर शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष किरणशेठ लोखंडे, मोई ग्रामपंचायत सरपंच चंदनशेठ मुऱ्हे आदी उपस्थित होते.

श्री गुरु चरित्र पारायण सोहळ्याचे ग्रंथ पूजन पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास महाराज बालवाडकर, भगवान पोखरकर, राहुल चव्हाण, अर्जुन मेदनकर यांचे हस्ते झाले. (Alandi)


श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट , श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अनाथ आश्रम मरकळ यांचे वतीने दत्तजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक नागरिक, वारकरी यांनी या जन्मोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन ताई माउली महाराज यांनी केले आहे.

श्री दत्तजन्मोत्सव सोहळ्यासाठी पुणे, रायगड, कोकण, मुंबई येथील दत्तभक्त, भाविक मरकळच्या दत्तमंदिरात दर्शनास मोठ्या संख्येने येत असतात. मंदिर परिसरात या निमित्त लक्षवेधी भगव्या पताका, भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध रंगीबेरंगी आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली आहे. विविध फुलांची सजावट केल्यामुळे मंदिरे लक्षवेधी दिसत होते.

वारकरी भजन, दत्तभजन यांच्या सुमधुर आवाजाने मंदिरासह परिसर धार्मिक भक्तिमय वातावरणात दुमदुमला हरी ओम तत्सत् जय गुरुदत्त दत्त या मंत्राचा अखंड जप झंझाळ. ज्ञानेश्‍वरी व गुरुचरित्र पारायणाचे वाचन, अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दिपप्रज्ज्वलन, वीणा, गुरुचरित्र आणि ग्रंथ पूजन, प्रतिमा पूजन, श्रीनां अभिषेक, पूजा, आरती करून सुरुवात झाली आहे. (Alandi)

अखंड हरिनाम सप्ताहात दररोज काकडा आरती, नित्य आरती, पारायण, होमहवन, भजन सेवा, हरिपाठ, आरती, किर्तन, अन्नदान, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम परंपरेने होत असल्याचे ताई माउली महाराज यांनी सांगितले. मरकळ व परिसरातील नागरिक, भाविकांना मोठ्या मंगलमय धार्मिक वातावरणात अन्नदान केले जात आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय