Thursday, December 12, 2024
Homeताज्या बातम्याAjit Pawar : अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत केला...

Ajit Pawar : अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत केला विक्रम

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणाचा ऐतिहासिक दिवस म्हणून आजचा दिवस महत्वाचा ठरला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अतिशय भव्य स्वरूपात पार पडला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत ऐतिहासिक विक्रम नोंदवला.

या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. तब्बल चाळीस हजार नागरिकांनी उपस्थिती लावून या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार झाला.

अजित पवार यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणून राजकारणात पदार्पण केले. तेव्हापासून सातत्याने निवडून येत त्यांनी राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्रालयांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात दोन वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अजित पवारांनी 2019 मध्ये महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्रिपद सांभाळले. जुलै 2023 मध्ये शिंदे सरकारमध्ये सामील होत त्यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

आजच्या महायुती सरकारच्या नव्या शपथविधीत अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत, ज्यामुळे ते सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे नेते ठरले आहेत.

Ajit Pawar

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय