पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पळसखेडचे कवी ना.धो. महानोर यांची रानातली कविता प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले. (PCMC)
या शेताने लळा लाविला असा की सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला….. असे शेतकऱ्यांचे जीवन आणि त्यांचे अनेक पैलू ना.धो.यांनी मांडले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, घरेलु कामगार महासंघातर्फे आज ना. धो. महानोर यांचे जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, ओमप्रकाश मोरया, कृष्णा कुमार, अनिता मोरे, सुरेखा माने, देवीलाल, अनिल चव्हाण, सहदेव होनमाने, सलीम डांगे, हरि भोई, मनोज यादव, आदि उपस्थित होते. (PCMC)
रानकवी, गीतकार म्हणून ते प्रसिद्ध होते, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव आणि शरदचंद्र पवार यांचेशी जवळचे नाते होते. त्या माध्यमातून आमदार पद मिळाले, त्यात ही त्यांनी शेतकरी व्यथा मांडून सोडवल्या. पुढे त्यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले. मात्र त्यांनी शेती, गाव सोडले नाही ते नेहमी जमिनीवर राहिले.
त्यांच्या अनेक कविता अनेक गीते महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झाले जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता अशा चित्रपटातले गाणे लोकप्रिय ठरले.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती