Tuesday, December 3, 2024
Homeताज्या बातम्याNarayan Rane : "घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन" नारायण राणे यांची...

Narayan Rane : “घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Narayan Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे नेते घटनास्थळी पाहणीसाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले. यावेळी, भाजप खासदार नारायण राणे आणि भाजप नेते निलेश राणे देखील आपल्या समर्थकांसह तिथे दाखल झाले. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राणे समर्थक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली आणि यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाला.

या तणावपूर्ण परिस्थितीत, जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ हायव्होल्टेज घडामोडी घडल्या. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. मात्र, या राड्यानंतर नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. “घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन,” अशी धमकीच माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे.

नारायण राणे (Narayan Rane) यांच्या या विधानावर जोरदार टीका होत असून जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. आव्हाड यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहले आहे की, “घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” ही भाषा आहे माजी केंद्रीय मंत्र्यांची ! तीही कोणासाठी, तर राजकोट किल्ल्यावर जमलेल्या शिवप्रेमींसाठी..! एक तर भ्रष्टाचार करायचा, आणि त्यातून नुकसान झालं, तो उघड झाला की ही गुंडगिरी करायची. भाजपच्या नादाला लागलेल्या या मंत्र्यांनी कोकणासह महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांनाही लाज वाटेल असं आज कृत्य केलंय. पक्षाला वाचवायच्या नादात यांची गुंडगिरी एवढी वाढलीये की राज्यातील नेत्यांनाही धमकावण्यापर्यंत यांची मजल गेलीये. बरं आता यांना वाचवायला कायदा आणि सुव्यवस्था डोळे झाकून राहणार यात काही नवल नाही. राज्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय..!

Narayan Rane यांच्या विधानावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “राणेंची बोलण्याची पद्धत आहे. ते बोलताना आक्रमक असतात. पण ते धमक्या देतील असं माहीत नाही,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेवर कोणीही राजकारण करू नये. ही घटना सर्वांसाठी कमीपणा आणणारी आणि दु:खद आहे. या घटनेची योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तिथे भव्य पुतळा उभारला पाहिजे. नेव्हीने या संदर्भात चौकशी समिती स्थापन केली आहे, आणि दोषींवर कारवाई करेल.”

राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, यामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष

संतापजनक : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आठ महिन्यांतच कोसळला, पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात

संबंधित लेख

लोकप्रिय