गाझियाबाद : सोशल मीडियावर रिल बनवण्याच्या नादात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अशा दुर्घटनांच्या मालिकेत एक नवीन प्रकरण समोर आले आहे. गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील क्लाउड 9 सोसायटीत मंगळवारी एक 16 वर्षीय मुलगी मोबाईलवर रिल बनवताना सहाव्या मजल्याच्या बाल्कनीवरून पडली. (Viral Video)
सुदैवाने, पडण्याच्या वेळी ती एका मोठ्या फूलांच्या कुंडीत पडल्याने तिचा जीव वाचला, मात्र तिचा पाय मोडला असून ती जबर जखमी झाली आहे.
सहाय्यक आयुक्त स्वंतंत्र सिंग यांनी सांगितले की, मुलगी क्लाउड 9 सोसायटीच्या बाल्कनीवरून पडली, परंतु ती मोठ्या फूलांच्या कुंडीत पडल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. सुरक्षारक्षकाने मोठा आवाज ऐकला आणि त्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Viral Video)
या घटनाक्रमाने पुन्हा एकदा सोशल मीडिया रिल बनवताना होणाऱ्या अपघातांची गंभीरता अधोरेखित केली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी :…तर लाडकी बहीण योजना थांबवू ; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या