Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल साधने देणार - रवींद्र काळे

PCMC : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल साधने देणार – रवींद्र काळे

लायन्स क्लब आॅफ पिंपरी चिंचवड कार्पोरेटच्या अध्यक्षपदी रवींद्र काळे यांची निवड (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र काळे यांची लायन्स क्लब आॅफ पिंपरी चिंचवड कार्पोरेटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हा पदग्रहण समारंभ दोन ऑगस्ट 24 रोजी काशीधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे नुकताच पार पडला या क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायन रवींद्र काळे यांना पी एम जे एफ लायन राजेश जी अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची शपथ दिली.

सामजिक उत्तरदायित्व आणि सामाजिक बांधिलकी

सामजिक उत्तरदायित्व आणि सामाजिक बांधिलकीच्या उद्दात हेतूने मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत आहे, पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात विशेषतः मावळ येथील गावामध्ये मी मागील वर्षी दौरा केला होता.

येथील गोरगरीब मुलांना ऑनलाईन डिजिटल साधने देऊन त्यांना शिक्षणासाठी मदत करणार आहे, यामध्ये शाळांना, तसेच समाज मंदिरात मुलांना विशेष सॉफ्ट स्किल शिक्षण देण्यासाठी संगणक व इतर शैक्षणिक साधने लायन्स क्लब पिंपरी चिंचवड कार्पोरेटच्या वतीने देण्यात येतील, असे रविंद्र काळे यांनी चिंचवड येथे सांगितले.

या पदग्रहण समारंभात क्लबचे सेक्रेटरी लायन शिरीष कुंभार व खजिनदार लायन गोपाल कुलकर्णी यांनाही शपथ देण्यात आली.

यावेळी रिजन चेअर पर्सन प्रा. लायन शैलजा सांगळे व झोन चेअर पर्सन लायन अनिल भांगडीया उपस्थित होते. (PCMC)

या कार्यक्रमासाठी या क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये लायन सदाशिव लिखितकर लायन अनिल गालींदे, लायन हंबीरराव आवटे, लायन गजानन चिंचवडे व क्लबचे इतर सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन अलका लिखितकर यांनी केले

संबंधित लेख

लोकप्रिय