Wednesday, February 5, 2025

धर्म आणि राजकारण याच्या सांगडीने अधोगती होते – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

सांगली / राहुल खरात : देशाच्या राजकारणाची दशा दिसत आहे तर दिशा स्पष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म आणि राजकारणाची फारकत पाहिजे. या अर्थाने देशातील राजकारणातील व्यक्तिवाद व धार्मिक ध्रुवीकरणाने अधोगती होत असून ती थोपवली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

रामानंदनगर येथे समाजवादी प्रबोधिनी व व्ही वाय आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी आयोजित आचार्य शांतारामबापू गरूड व्याख्यानमालेत राजकारणाची दशा आणि दिशा या विषयावरील पहीले पुष्प त्यांनी गुंफले. 

व्हिडिओ व्हायरल : इंधन दरवाढीच्या प्रश्नावर बाबा रामदेव संतापले

याप्रसंगी ते म्हणाले, “पुरोगामी पक्षांनी वैचारिक पायावरील नवी पिढी घडवली नाही ही मोठी कमजोरी असल्याने राजकारणाचे व संस्कृतीचे विकृतीकरण आणि बाजारीकरण झाले आहे. राजकारण हे सत्ताकारण बनले असून भुलथापांना व खोटे बोलण्याला सीमा राहीली नाही. लोकांच्या अपेक्षांना प्राधान्य देवुन लोकांना विश्वासात घेतले तर सक्षम पर्याय तयार होईल.” 

याप्रसंगी डॉ अमोल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. एन. डी. पाटील, कॅप्टन रामभाऊ लाड, कॉ. नामदेव गावडे यांना श्रध्दांजली वाहिली. आदम पठाण  यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. यानंतर मोहीते यांच्या सुश्राव्य पसायदानाने समारोप झाला. 

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढ थांबेना, सलग नवव्यांदा वाढ

याप्रसंगी व्ही‌.वाय. पाटील, डॉ. अमोल पवार, मारुती शिरतोडे, शिवाजीराव अडसूळ, पी. के. माने, प्रा.लक्ष्मण मोटे, एन. जे. पाटील, फाटक गुरुजी, बी. बी. खोत, जयवंत मोहीते, तानाजी चव्हाण, उत्तम सुतार, सुनिल पाटील, दिलीप पाटील, संदीप नाझरे, शहाजी चव्हाण, परवेज पिरजादे, सुनिल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles