मुंबई : मागील तीन दिवसापासून पासून मुंबईसह कोकण पट्टीतील तिन्ही जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे राज्याच्या अनेक शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Weather Forecast)
शुक्रवारी रात्रीनंतर मुंबई, ठाणे, रायगड सह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मध्ये पावसाचा जोर वाढला जोर वाढला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सातारा, कोल्हापूर उर्वरित मध्य महाराष्ट्रात प्रमुख नद्यांना पूर आला आहे. (Weather Forecast)
पवना धरण क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी
मावळ परिसरात शनिवारी (दि. 13) दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पवना धरणात 23.62 इतका पाणीसाठा असून आठवड्याभरात 4 टक्के पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे.
संपूर्ण पश्चिम घाट माथा परिसरात अती मुसळधार पावसाचा येलो अलर्ट IMD ने जारी केला आहे.
संपूर्ण राज्यात दि.14 ते दि.16 पर्यंत जोरदार पर्जन्य वृष्टी होणार आहे. त्यामुळे राज्यसरकारने पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव केला आहे.
(14-07-2024 : Moderate to Intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Mumbai, Sindhudurg and Ghat areas of Pune during next 3-4 hours. -IMD MUMBAI)
मुंबई किनारपट्टीवर समुद्राला उधाण आले आहे, धो धो बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूककोंडी झाली. सायन, वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळील रस्त्यावर पाणी भरल्याने बेस्ट बस मार्गांत बदल करण्यात आले आहेत.(Weather Forecast)
पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, ठाणे, रायगड, मुंबई, पालघर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जळगाव या शहरासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य प्रशासनाने केले आहे.(Weather Forecast)
हेही वाचा :
धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक
निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !
दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार
धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल