MSRTC : ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना ST बसेससाठीचे पास मिळवण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) एका क्रांतिकारी निर्णयात विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच ST पास वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी बसचा वापर करावा लागतो. त्यासाठी विद्यार्थी महिन्याच्या सुरवातीला पास काढतात. पण पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तासनतास मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. यावर आता एस.टी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एस. टी. चे पास हे त्यांच्या शाळेमध्ये वितरित केले जाणार आहेत. एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एस. टी. प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या या योजनेअंतर्गत ST चे पास विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच वितरित केले जातील. शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून परिवहन मंडळाकडे सादर करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांचे पास शाळेतच मिळतील. 18 जून पासून एस. टी. चे पास थेट शाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
MSRTC च्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना होणार फायदा
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना ST चा पास काढण्यासाठी परिवहन मंडळाच्या कार्यालयात जाण्याची आणि लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाहीशी होणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. तसेच, पालकांवरचा ताणही कमी होणार आहे.


हेही वाचा :
मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा
CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती
मोठी बातमी : कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला मालगाडीची मागून धडक, अनेक प्रवासी जखमी
धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना
ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती