Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune rain : पुण्यात पहिल्याच पावसाने शहर का तुंबले? नागरिक हैराण

Pune rain : पुण्यात पहिल्याच पावसाने शहर का तुंबले? नागरिक हैराण

प्रचंड वाहतूक कोंडी, ३२ ठिकाणी झाडे कोसळली

पुणे शहरात मान्सूनच्या पावसाने जोरदार सुरवात केली. शनिवारी (८ जुन) सायंकाळी सलग दोन तास ६५ मिमी इतका सर्वात जास्त पाऊस शहरात पडला. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. Heavy rain fall in pune city

कोथरुड, शिवाजी नगर,अलका टाकीज चौक, कात्रज, सिहगड रोड, पाषाण, वारजे माळवाडी शिवाजी नगर, चांदणी चौक सह शहरातील प्रमुख रस्त्याना नदीचे स्वरूप आले. शहरातील नाल्याना पूर आला, त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनांना पाण्यातून मार्ग काढून पुढे जावे लागले. pune rain

सखल भागात घरामध्ये पाणी शिरले,शहराच्या प्रमुख चौकात रिक्षा दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडली, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी या पावसाने निर्माण झाली. All the streets of Pune city were flooded with monsoon rains

वादळी पावसाने ३२ ठिकाणी झाडे पडून संपूर्ण शहरात तुफानी पावसाने प्रशासनाचे तीन तेरा वाजवले.काही तासात विक्रमी पाऊस पडल्यामुळे शहरात पाणीच पाणी (water logging) झालं. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मागील दोन ते तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस पडत आहे. पुण्यात झालेल्या पावसामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. rainfall in just two hours

ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर  पाणी साचले. नाले सफाई झाली नसल्याच स्पष्ट झालं आहे. महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची लक्तर या पावसानं काढली आहेत.  

कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून यासह अनेक परिसरात रस्ते तुंबल्याचे दिसले. हे असे का होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. Pune news

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

संबंधित लेख

लोकप्रिय