Cleaning Tips : सध्या वातावरणात प्रचंड प्रदूषण आणि धूळ आहे. अशावेळी आपल्याला आपले घर स्वच्छ ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातून रोज केर काढणे, लादी पुसणेही फार महत्त्वाचे असते. परंतु नुसत्या वॉशने किंवा इतर कोणत्याही गोष्टींनी आपली लादी पुसूनही जर का मुंग्या, झुरळं आणि इतर अस्वच्छता वाटत असेल तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो पाहुयात नक्की अशावेळी आपण काय केले पाहिजे.
फक्त पाण्याने लादी पुसून काही फायद्याचे होत नाही, त्यात काही योग्य गोष्टी टाकून आपण आपली लादी स्वच्छ ठेवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला काही त्रास देखील होणार नाही. अशावेली आपण घरात लहान बाळ किंवा मग लहान मुलं असतील तर त्यासाठी आपल्याला स्वच्छता राखणे हे महत्त्वाचे असते.
लादी पुसण्यासाठी आपण जुंतूनाशक वापरतो किंवा फिनेल वापरतो. खरंतर फरशीवर विविध प्रकारचे डाग असतात. त्यातून अनेकदा जे खाली जेवायला बसतात त्यांच्या फरशीवर खाण्याचे डागही असतात. त्यामुळे आपल्याला ते वेळीच साफ करायला हवेत. परंतु यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी जंतुनाशक वापरण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही घरातलेही काही पदार्थ वापरू शकता.
Cleaning Tips
पाहुयात नक्की हे पदार्थ कोणते आणि त्याचा वापर तुम्ही कसा करू शकता. फरशी साफ करताना ती योग्य पद्धतीने आणि नीट साफ करावी लागते. त्यातून कानाकोपऱ्यातही घाण असते तेव्हा आपल्याला सर्वबाजूने फरशी साफ करणे आवश्यक असते. खासकरून आपल्या किचनमधील म्हणजेच स्वयंपाकघरातील फरशी योग्य पद्धतीने साफ करणे फारच महत्त्वाचे असते. (Cleaning Tips)
फरशी पुसण्यासाठी तुम्ही पाण्यात व्हिनेगर आणि फ्लोअर डिसइन्फेक्टंट टाकू शकता. यामुळे तुमची फरशी चकाचक होईल. व्हिनेगर हे फारच फायदेशीर ठरते आणि त्यामुळे मुंग्या किंवा इतर कीटकही येत नाहीत. त्यासोबत तुम्ही पाण्यात बेकिंग सोडा आणि डिशवॉशर लिक्विडही टाकू शकता. याचे प्रमाण हे साधारणपणे एक वाटी ठेवा. यामुळे काही वेळाने ओली फरशी सुखू द्या आणि वाळल्यावर तुम्हाला फरक जाणवेल. काही दिवस हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला यातील फरक जाणवू लागेल.
जास्त महागडे किंवा हानिकारक केमिकल्स वापरू नका. त्यातून लादी पुसताना मायक्रोफायबर कापड वापरावे. जास्त पाण्याचा वापर करू नका. त्यातून तुम्ही जास्त पाणी वापरले तर कदाचित फरशी खराब होण्याचाही शक्यता असते. त्यामुळे लादी पुसताना ती हलकेच पुसा.
हेही वाचा :
ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित
एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
मोठी बातमी : CISF च्या जवानाने थेट कंगना रणौतच्या कालशिलात लगावली, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ विधीची तारिख ठरली, मात्र…
फार्मासिस्ट, नर्स, टेक्निशियन, सायंटिफिक ऑफिसर अशा विविध पदांसाठी मोठी भरती
बारामती लोकसभेला वाजली तुतारी विधानसभेत कोण पडणार अजित दादांवर भारी ?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार