Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याAjit pawar NCP : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

Ajit pawar NCP : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

Ajit pawar NCP : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला महायुतीकडून चार जागा मिळाल्या होत्या त्यापैकी अजित पवार यांच्या पक्षाचे तीन उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) महाराष्ट्रातील चार जागांवर निवडणूक लढवत आहे. या जागांमध्ये बारामती, रायगड, शिरूर आणि परभणी या जागांचा समावेश आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे तीन उमेदवार पिछाडीवर आहेत. तर रायगड मधून सुनिल तटकरे हे आघाडीवर आहेत. त्यांना 11 वाजून 20 मिनिटांच्या आकडेवारीनुसार एकुण 1 लाख 47 हजार 661 मते मिळाली असून ते 22 हजार 206 मतांनी आघाडीवर आहेत.

देशाचे लक्ष लागुन असलेला बारामती मतदारसंघ विशेष महत्त्वाचा आहे. हा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत​ सुनेत्रा पवार यांना शरद पवार यांच्या मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले आहे. बारामतीत देखील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत.

Ajit pawar NCP

11 वाजून 20 मिनिटांच्या आकडेवारीनुसार

बारामती लोकसभा
सुप्रिया सुळे – मते 45 हजार 565
सुनेत्रा पवार – मते 37 हजार 031
फरक – 8534

रायगड लोकसभा
सुनिल तटकरे – मते 151877
अनंत गिते – मते 130650
फरक – 21227

शिरूर लोकसभा
अमोल कोल्हे – मते 108846
शिवाजीराव आढळराव पाटील – मते 91689
फरक – 17157

धाराशिव लोकसभा
ओमप्रकाश राजेनिंबाळकर – मते 1 लाख 39 हजार 780
अर्चना पाटील – मते 80 हजार 361
फरक – 59419

दरम्यान, या निकालामुळे पक्षात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !

संबंधित लेख

लोकप्रिय