तलासरी : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे महाराष्ट्र राज्य अभ्यास शिबिर आजपासून कॉम्रेड गोदावरी परुळेकर भवन, तलासरी येथे सुरु झाले. दिनांक ३० मे ते २ जून २०२४ असे चार दिवस हे शिबिर होऊ घातले आहे. शिबिराची सुरुवात “स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद” कोरलेला एसएफआयचा (SFI) ध्वज राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांच्या हस्ते फडकावून उत्साहात झाली. त्यानंतर महामानवांना अभिवादन आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रा. पंडित मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. (SFI)
शिबिराचे उद्घाटन डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केले. राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ हे उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर एसएफआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदर्श एम. साजी, राज्य सरचिटणीस रोहिदास जाधव, जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर, डीवायएफआयचे राज्य अध्यक्ष व तलासरी पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार हाडळ, तलासरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता शिंगाडा, माकपचे तालुका सचिव लक्ष्मण डोंबरे, तलासरीचे नगराध्यक्ष सुरेश भोये, किसान सभेचे नेते चंद्रकांत घोरखाना, नगरसेवक सुहास सुरती, कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्यासह एसएफआय राज्य सचिवमंडळाचे सदस्य उपस्थित होते. (SFI)
यावेळी उद्घाटनप्रसंगी संबोधित करताना कॉम्रेड निकोले म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी जगाला पाहिजे, याच्यासाठी आपला संघर्ष आहे. स्वातंत्र्यानंतरही या भागामधील माणसाला माणूस म्हणून जगणे शक्य नव्हते, त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जगणे डाव्या चळवळीने लढून मिळवून दिले. त्याचे नेतृत्व कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि कॉम्रेड शामराव परुळेकर यांनी केले आणि त्यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. आदिवासींवर प्रचंड अन्याय, अत्याचार सुरू होता, त्यांना न्याय देण्याचे काम लाल बावट्याने केले. आजही शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक यांच्या विरोधात धोरणे राबवली जात आहे. आज विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना एकजूट करून मोठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. ती आपण कराल, अशी अपेक्षा निकोले यांनी व्यक्त केली. (SFI)

यावेळी जनवादी महिला संघटनेच्यावतीने राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर, डीवायएफआयच्या वतीने नंदकुमार हाडळ, प्राचार्य डॉ. राजपूत सर, नगराध्यक्ष सुरेश भोये यांनी शुभेच्छा व्यक्त करत मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रथम सत्रात ‘नवीन शैक्षणिक धोरण व आव्हाने’ या विषयावर एमफुक्टो या प्राध्यापक संघटनेच्या माजी अध्यक्ष प्रा. ताप्ती मुखोपाध्याय व बुक्टो या प्राध्यापक संघटनेच्या सरचिटणीस मधु परांजपे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत धोकादायक असून बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारणारे आहे. हे धोरण, शिक्षणाचे केंद्रीकरण करणारे असून खाजगीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी या धोरणाला विरोध करण्याची गरज आहे.
तर दुसऱ्या सत्रात ‘एसएफआयचा गौरवशाली इतिहास आणि आव्हाने’ या विषयावर एसएफआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदर्श एम. साजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एसएफआय ही सर्वांना शिक्षण, सर्वांना काम, ही मागणी घेऊन लढत असताना अभ्यास व संघर्षाचा नारा देत विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नांना घेऊन १९७० सालापासून अविरत संघर्ष करत आहे. आपण आजपर्यंत अनेक सरकारांना विद्यार्थी विरोधी धोरणे मागे घेण्यास भाग पाडले आहे. आजचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार विद्यार्थी विरोधी धोरणे अत्यंत वेगाने लादत असताना आपली जबाबदारी वाढली असून याविरोधात संघर्ष करणे अत्यावश्यक बनवले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला संघटीत करून जनसमुदायत जाऊन विद्यार्थी विरोधी धोरणे सरकारला मागे घेण्यासाठी भाग पडण्यासाठी तीव्र लढा उभारावा लागेल, महाराष्ट्राची एसएफआय याला निर्धाराने तोंड देईल, असेही ते म्हणाले.
पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी पल्लवी बोरडकर तर सूत्रसंचालन अशोक शेरकर आणि देवीलाल बागुल यांनी केले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी सायली अवघडे तर सूत्रसंचालन संदेश रामटेके व नितीन कानल यांनी केले.
संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. पुढील अजुन तीन दिवस उत्साहात हे शिबिर चालेल.


हेही वाचा :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल
जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता
ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी
लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक