पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यातून जाणारा रस्ता मुंबई-पुणे या महामार्गावरील निगडी ते दापोडी १२.५ किलोमीटर रस्त्यावर महानगरपालिकेकडून दोन्ही बाजूने रंगबेरंगी पेव्हर ब्लॉक, फुलझाडे, हिरवळ, रंगरंगोटीद्वारे सुशोभीकरण करण्यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक खर्च करण्यात येणार आहे, हे शुशोभीकरण करा मात्र या रस्त्यावरील हातगाडी, स्टॉलधारकांचा (hawkers) त्यात समावेश करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज दिला. PCMC
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे निगडी ते दापोडी या महामार्गावरील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांची आढावा बैठक आज चिंचवड येथे आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. (pcmc)
बैठकीस महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजु बिराजदार, कार्याध्यक्ष संभाजी वाघमारे, निमंत्रक बालाजी लोखंडे, अध्यक्ष सय्यद अली, अनिता कुमार, अनिता भुजबळ, रुक्मिणी धावारे, ज्ञानदेव चव्हाण, लता कुंबेकर, महादेव माने, समीर बागवान, मनोज यादव, मधुकर वाघमारे, सिद्धाराम पुजारी, रमेश डेंगळे, रमेश वाणी, ओम शर्मा, संतोष वाघमारे, शिवाजी पौडमल आदीसह या मार्गावरील विक्रेते उपस्थित होते.
निगडी ते दापोडी मार्गाच्या सुशोभीकरणासाठी कामाचां अंदाजे खर्च १०९.३८ कोटी रुपये आहे, आणि हे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत रस्ता सुशोभीकरणासाठी शहरी रस्ता डिझाइन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. या प्रकल्पात पदपथ, सायकल ट्रॅक, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे आणि हिरवळ लावण्याचे नियोजन आहे .सुशोभीकरणाच्या या योजनेत पदपथाचे काम पूर्ण होणे आणि सायकल चालविण्यासाठी सोयीस्कर वातावरण निर्माण करणे हे मुख्य उद्देश आहेत. यास आमचा विरोध नाही मात्र यात आमचे फेरीवाल्यांसाठी व रिक्षाचालक यांचेसाठी योग्य जागा देऊन त्यांचा व्यवसाय सुरू ठेवता येतील अशा उपाययोजना देखील करण्यात याबाबत आयुक्त शेखर सिंह यांचेसोबत झालेल्या बैठकीत चर्चा केली आहे असे नखाते यांनी नमूद केले. (pcmc)
प्रास्ताविक किरण साडेकर, यांनी तर आभार ओमप्रकाश मोरया यांनी व्यक्त केले.


हेही वाचा :
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती