Nagpur : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने दोघांना दारूच्या नशेत कारने चिरडलं. यात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. अशात आता नागपुरातही अशीच हिट अँड रनची घटना घडल्याची बातमी समोर आली आहे.
नागपुरात झेंडा चौकामध्ये शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’ची घटना घडलेली आहे. या अपघातात पायी जाणारे तीन जण जखमी झाले त्यात एक महिला, एक पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील एकाला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. तर कारमधील इतर सर्वजण पळून गेले होते.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीत बसलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यात कारचालक आणि कारमध्ये बसलेले तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असून पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी पाठवले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये 32 ग्राम गांजा जप्त केला. त्यात दोन विदेशी दारूच्या दोन बॉटल मिळून आल्या आहेत.
Nagpur हिट अँड रन
या प्रकरणी पोलिस आता (Nagpur News) अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी कारचालक सह कारमध्ये बसलेल्या इतर तरुणांना देखील ताब्यात घेतलं आहे. त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलंय. तसेच त्यांच्या गाडीतून बिअरच्या बॉटल सुद्धा मिळाल्या आहेत. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


हेही वाचा :
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन
ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती