Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याPune Accident : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक...

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एक भीषण अपघाताची घटना घडली होती. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आलिशान पोर्शे कारने दोन संगणक अभियंते अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना कारने उडवले होते. यात त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवालने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात पोर्शे कारचा स्पीड 170-180 किमी प्रतितास असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी बड्या उद्योगपतीचा मुलगा असल्याने त्याला वाचविण्याचे अनेक प्रकार समोर आले. गुन्ह्याचे कलम लावण्यापासून ते कार तो चालवतच नव्हता अशा अनेक गोष्टीमध्ये आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. यात स्थानिक आमदार देखील सहभागी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात होता.

बारावीच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी तो बारमधील मित्रांसोबत बसून दारु पित असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्या टेबलवर वेगवेगळ्या अल्कोहलच्या बाटल्या दिसत होत्या. (Pune Accident)

घटनेनंतर पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील कठोर कारवाईसाठी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) याला अटक केली आहे.

विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्यावर गु्न्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होता. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले आहे.

Pune Accident

मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार (Porsche car) चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते. विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणून न्यायालयात हजर केले जाईल.

आरोपीला पोलिस ठाण्यात पिझ्झा, बर्गर

या अपघातानंतर आरोपी वेदांतने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र जमावानं त्याला पकडत चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक म्हणजे आरोपीला पोलिस ठाण्यात पिझ्झा, बर्गर देण्यात आला.

पब चालकांवर गुन्हा दाखल

या अपघातानंतर वेदांत अग्रवाल हा ज्या हॉटेलमध्ये दारु प्यायला होता, त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पब मालकाला अटक करण्यात आली आहे.

कारची नोंदणीच नाही

अपघातातील पोर्शे कारची नोंदणी नसताना पुण्यातील रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती या निमित्ताने समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार विनाक्रमांक व विनानोंदणी होती.

न्यायालयाचा अजब निर्णय

या अपघाताच्या घटनेनंतर आरोपीला 15 तासांत जामीन मंजूर झाला. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला गेला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना आरोपींना अपघातावर 300 शब्दात निबंध लिहिण्यासह १५ दिवस येरवडा वाहतूक पोलिसात स्वेच्छेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. अल्कोहोल सोडण्यास मदत करण्यासाठी अल्पवयीन व्यक्तीला डॉक्टरांचा मानसोपचार सल्ला घेण्यास देखील सांगितले आहे. तसेच वेदांत अगरवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

संबंधित लेख

लोकप्रिय