पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आता विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे. (PCMC)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड (pcmc) च्या वतीने प्रफुल पटेल तसेच महायुतीच्या नेत्याच्या विरोधात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मूक निषेध आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालण्याचं प्रफुल्ल पटेल यांचं धाडस कसं झालं. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख यांनी केला. pcmc news
यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले “छत्रपती शिवरायांची भूमिका करताना अनेक लोक,अगदी शाळकरी मुलं त्यांची वेशभूषा करतात, डोक्यावर जिरेटोप घालतात. तो अभिनय असतो, नक्कल असते. सामान्य माणसांना हे समजत म्हणून कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत.
मात्र प्रफुल्ल पटेलांनी जे केलेलं आहे तो शुद्ध लाळघोटेपणा आणि लाचारीची परिसीमा आहे.
जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. pcmc news
महायुती दिल्लीच्या तख्तापुढे लाचार झाली आहे, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय.महाराजांचा अवमान करणा- महायुती आणि भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!” pcmc news
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, युवा नेते कमलेश वाळके, सचिन निंबाळकर, संतोष माळी अथर्व शिंदे, यश नितेश, मयूर खरात, आशिष खत्री, अजय पवार, राजेश हरगुडे, नितीन मोरे, नवनाथ साबळे, हनिफ अत्तर, अभिषेक गिरी, अशरफ शेख, सत्यम साळवे, नियमात शेख, शाहिद शेख, प्रदीप जगताप, सलमान खान ,मोसीम शेख, ऋषिकेश गरडे, बबीता बनसोडे, सूरज देशमाने, रेखा मोरे, बबिता बनसोडे, समाधान अचलखांब आणि मोठ्या संख्येनी यूवक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी
Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
खासदार नवनीत राणा यांच्या घरी चोरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण किती संपत्ती, आकडेवारी एकूण व्हाल थक्क
मोठी बातमी : नारायणगावात महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 70 ते 80 जण ताब्यात