Thursday, April 25, 2024
HomeNewsकान्हे उप जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटर साठी ९ कोटी निधी मंजूर

कान्हे उप जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटर साठी ९ कोटी निधी मंजूर

कान्हे रुग्णालयातून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील – आमदार सुनिल शेळके

वडगाव मावळ/क्रांतिकुमार कडुलकर
:कान्हे येथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी नऊ कोटी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव अमा अत्राम यांनी गुरुवारी (दि.१३) दिले आहेत.कान्हे फाटा येथे पूर्वी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय होते.त्याचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि वीस खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यास राज्य शासनाने १जुलै २०२१ रोजी मान्यता दिली. हे रुग्णालय तळमजला अधिक तीन मजले अशी एकूण दहा हजार २५३चौरस मीटर क्षेत्रफळाचे असणार आहे.



सध्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तिसऱ्या मजल्याचे काम झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरचे पूर्ण बांधकाम होणार आहे.कान्हे उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ कोटी १२ लाख २ हजार रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.निधी मंजूर झाल्याने कामास अधिक गती मिळणार आहे.कान्हे उपजिल्हा रुग्णालय जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असून महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तात्काळ चांगले उपचारासाठी या रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग होणार आहे.काम वेळेत पूर्ण झाल्यास आंदर मावळातील नागरिकांसह संपुर्ण मावळवासियांना या उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे.

चौकट:-

ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कान्हे रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील तीन महिन्यांत बांधकाम पुर्ण झाल्यानंतर रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी वैद्यकीय साधनसामुग्रीची गरज असेत.आवश्यक असणाऱ्या सामुग्रीसाठी निधीची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.या हा विश्वास आहे.
– आमदार सुनिल शेळके.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय