Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाविश्वब्रेकिंग : भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण

ब्रेकिंग : भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र या सामन्या अगोदरच भारतीय संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने भारतीय संघाला मोठी धक्का बसला आहे.

सोमवारी (ता.1) भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली, त्या चाचणीमध्ये 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता बीसीसीआय लवकरच या खेळाडूंचे पर्यायी खेळाडू घोषित करू शकते.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आता पर्यत तीन जणांची नावे समोर आली आहेत, त्यात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन या तीन खेळाडूंना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, इतर खेळाडूंच्या नावांची अद्याप पुष्टी होऊ शकली नाही.

भारत आणि वेस्ट इंडिजमधील तिन्ही वनडे सामने 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघ 1 तारखेला पोहोचला असून वेस्ट इंडिज संघही नुकताच अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.

शेतकऱ्याच्या पोराची टीम इंडियामध्ये दणक्यात एंट्री, क्रिकेटच्या वेडापायी बोर्डाची परीक्षाच दिली नाही…!

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात येत्या 6 फेब्रुवारीला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ वेस्टइंडिज संघासोबत 3 एकदिवसीय सामने आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळेले जाणार आहे. मात्र भारतीय संघातील 7 खेळाडू कोरोनाची लागण झाल्याने ही मालिका वेळेवर होईल किंवा नाही याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते.

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये जमा करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय