Thursday, July 18, 2024
Homeराज्यहिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनी निलंबित

हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनी निलंबित

कर्नाटक : कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद चांगलाच पेटला आहे. हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या आणि प्रशासनाविरोधात निदर्शने केल्या प्रकरणी ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक मध्ये विद्यार्थिनींनी शाळा, महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे, न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने त्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तर शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना शनिवारी निलंबित करण्यात आले.

आम्ही महाविद्यालयात आलो, त्यावेळी आम्हाला महाविद्यालयात येण्यापासून रोखले. तसेच प्राचार्यानी आम्हाला निलंबित केल्याचे सांगितले. आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही”, असे निलंबित विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय