Thursday, December 5, 2024
Homeशिक्षणराज्यातील शिक्षण क्षेत्रातील ५ महत्वाच्या बातम्या; वाचा सविस्तर

राज्यातील शिक्षण क्षेत्रातील ५ महत्वाच्या बातम्या; वाचा सविस्तर

१. सरकारी शाळांनाही ऑनलाईन शिक्षण – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू. 

खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचे आहे. 

यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घ्यावी.

२. बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून सुरू होणार.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.

३. पाचवीचे २१ जुलैपासून ऑनलाईन वर्ग – 

राज्यातील कोवीडची परिस्थिती पहाता शालेय शिक्षण कसे सुरू होणार याबाबत चिंता होती. ती चिंता आता दूर होणार असून २१ जुलै पासून पाचवीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 

४. सक्तीने शुल्‍क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई.

काही शाळा केवळ शुल्क वसुल करण्यासाठी वर्ग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सक्तीने शुल्क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

५. पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी.

शासनाने पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन शिक्षण घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. तसेच काही शाळा विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी सांगत आहेत, मनाई असताना काही शाळेतच पुस्तक विक्री करण्यात येत आहे. यानंतर तक्रार प्राप्‍त झाल्यास शाळा व्यवस्थापनासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री कडू यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय