Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : राज्यात लवकरच ४,८६० पदांची शिक्षक भरती होणार, शासन निर्णय जारी

Maharashtra Teachers Recruitment : समग्र शिक्षा योजने अंतर्गत राज्यात ४,८६० शिक्षक पदांच्या भरतीला गती मिळाली असून, यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामध्ये दिव्यांग विशेष शिक्षकांच्या २१८ पदांचाही समावेश आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत या शिक्षकांची प्रत्यक्ष पदस्थापना पूर्ण होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. (Teachers Bharti)

---Advertisement---

विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे आणि किरण सरनाईक यांनी राज्यातील दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली.

Teachers Bharti | येत्या दीड ते दोन महिन्यांत होणार भरती

दादाजी भुसे यांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि छाननी केली जाणार असून, पुढील दीड महिन्यांत सर्व पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील.

---Advertisement---

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देताना, विशेष शाळा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या शाळांसाठी अधिक पदे उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भविष्यात एक समिती नेमण्यात येणार असून, या समितीच्या शिफारशींच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील, असेही दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी भर पडणार असून, विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

हे ही वाचा :

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार, दिशा सालियन प्रकरणी वडिलांचे गंभीर आरोप

राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती होणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

नागपूर हिंसाचार प्रकरण ; हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Related Articles

- Advertisement -

Latest Articles