Thursday, January 23, 2025

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे 3 रे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन संपन्न

सिंधुदुर्ग : कॉ.रंजना निरुला नगरात, कॉ. महेंद्रसिंग सभागृहात व कॉ. सलीम पटेल सभामंचावर सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे तिसरे जिल्हा अधिवेशन हसत-खेळत पार पडले. कॉ.प्रा.डॉ. सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत व अर्चना धुरी यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजास सुरुवात झाली. सुरुवातीला दिवंगत सिटूचे व आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील नेते तसेच पुरोगामी व डाव्या चळवळीतील विचारवंत, कलाकार, लेखक, कवी आदरांजली वाहिली. 

सचिव कॉ.विजया पाटील यांनी 2017 – 2020 या पाच वर्षांचा संघटनात्मक आंदोलनात्मक अहवाल व सविस्तर जमाखर्च मांडला. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या प्रतिनिधींनीअहवालावर चर्चा केली, काही सुधारणा सुचवल्या. हे दोन्ही अहवाल व जमाखर्च सर्वानुमते मंजूर करण्यात आले. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार “इतका” प्रोत्साहन भत्ता

महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला, “या” जिह्यात उष्माघाताचा पहिला बळी

त्यानंतर पुढील तीन वर्षासाठी नवीन तालुका कमिट्या व जिल्हा कमिटी यांची निवड करण्यात आली. जिल्हा कमिटीवर जिल्हाध्यक्षपदी प्रियांका तावडे, सचिवपदी कॉ.विजया पाटील, खजिनदारपदी नम्रता वळंजू, उपाध्यक्षपदी अर्चना धुरी, कॉ. सुभाष जाधव, सहसचिवपदी सुप्रिया गवस, विनोद पाटील व सदस्य म्हणून विद्या सावंत, अंकिता कदम, निलिमा सारंग, कांचन देऊसकर, आरोही पावसकर व स्वप्नाली चव्हाण यांची निवड झाली. 

काही तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित नसल्याने 3 जागा रिक्त ठेवण्यात आल्या. त्यांची पुढील महिन्यात निवड केली जाणार आहे. मे 2022 मध्ये वर्धा या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन च्या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील 13 प्रतिनिधींची निवड करण्यात आली. 

ब्रेकिंग : महागाईचा भडका सुरूच, पेट्रोल 115 पार, तर डिझेलची शंभरी पार

राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठीत नामफलक बंधनकारक

आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांचे राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा, आशाना दरमहा रू. 22000 व गटप्रवर्तक यांना दरमहा रू 24000 मासिक वेतन सुरू करा, महिला अत्याचार विरोधी कायद्यांची कडक अंमलबजावणी करा, आशा व गटप्रवर्तक यांच्या कुटुंबियांना मोफत शासकीय मेडीक्लेम योजना जाहीर करा, आशा व गटप्रवर्तक यांना निश्चित वेतन मिळेपर्यंत विना मोबदला कामे सांगू नका, आशा व गट प्रवर्तक यांना मिळणाऱ्या मोबदल्यात कसलीही कपात करू नका, कामगार विरोधी चार संहिता त्वरित मागे घ्या, आशाना रेशनवर मोफत धान्य पुरवा, इ. ठराव प्रत्येक तालुक्यातील आशानी मांडले व सर्वानुमते आशा टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.

मुंबई विद्यापीठ प्राध्यापक युनियन च्या वतीने आशा व गटप्रवर्तक यांना एक लाख रुपये आपत्कालीन मदत निधी (पूरग्रस्त किट, दुर्धर आजारावर उपचार घेणाऱ्याना आर्थिक मदत, पती गमावलेल्याना आर्थिक मदत, आशा वा गटप्रवर्तक यांचे निधन झालेस त्यांच्या वारसांना आर्थिक मदत) दिला होता. त्यांच्या या अमूल्य मदतीबद्दल प्राध्यापक युनियनच्या महासचिव प्रा. डॉ. मधू परांजपे व अध्यक्ष प्रा. डॉ. जी बी. राजे यांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दोघानीही आपल्या मनोगतात उपस्थितांना  संघटना मजबूत करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक एकजूट मजबूत करण्याचे आवाहन केले, व बुद्धिजीवी शिक्षक नेहमी आपल्या पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली. 

आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन; जनवादी महिला संघटना, एसएफआय यांचा पाठिंबा

“या” मागणीसाठी आम आदमी पार्टीचे मुंबईत जोरदार आंदोलन, पोलिसांकडून आंदोलनकांची धरपकड

सिंधुदुर्गात जून 2021 मधील आंदोलनातील गुन्हे दाखल झालेल्या 23 लढाऊ आशांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. 

शेवटी प्रा.डॉ.सुभाष जाधव यांनी उपस्थित आशा व गटप्रवर्तक यांना संघटना बांधणी कशी करावी, संघटनेचे कामकाज कसे चालवावे, संघटना सभासद संख्या व सभासदांची आंदोलनातील संख्या कशी महत्त्वाची आहे, याबद्दल

सविस्तर मार्गदर्शन केले.

गेल्या दहा वर्षात संपूर्ण जिल्ह्यात संघटना वाढल्या बद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले. त्यानंतर नूतन जिल्हाध्यक्ष प्रियांका तावडे यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानून, पुढील तीन वर्षात संघटना मजबूत करण्यासाठी व आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे नम्र आवाहन केले. नूतन खजिनदार नम्रता वळंजू यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles