महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील 38 हजार 169 पोलिस नायक शिपायांना बढती देऊन त्यांची नियुक्ती थेट पोलिस हवालदार या पदावर ती करण्यात येणार आहे .राज्य शासनाने नायक शिपाई हे पद रद्द केल्याने राज्य पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांना बढती मिळणार आहे हे विशेष!
राज्य पोलीस दलात जवळपास एक लाख 97 हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. गृह मंत्रालयाद्वारे एका अधिसूचना अंतर्गत हा नवीन नियम सादर करण्यात आला आहे .या नियमांतर्गत पोलीस शिपाई हे पद आता जास्त व्यापक स्वरूपात सर्व पोलिस अधिकाऱ्यांना प्राप्त होईल.
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २०६ जागा !
अशा स्वरूपात पदोन्नती केल्यामुळे जवळपास 51 हजार पोलिसांना याचा लाभ होणार आहे .या आधी पोलिस नायक शिपाई या पदावर काम करत असताना फौजदारी गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार त्यांना प्राप्त नव्हते मात्र या पदोन्नतीच्या नवीन धोरणामुळे त्यांना हे विशेष अधिकार प्राप्त होणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली.
नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण
एखादा सिनेमा आवडला आणि त्याबद्दल लिहिण्याची हल्ली चोरीच झालीये, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत..