Saturday, March 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : २००८ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ७८ पैकी ३८ जणांना फाशी, तर ११ जणांना जन्मठेप

Photo : ANI 

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा विशेष न्यायालयाने आता आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने ३८ दोषींना फाशीची, तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

---Advertisement---

अहमदाबाद येथे २८ जुलै २००८ रोजी एकापाठोपाठ २१ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांत ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाचे प्रकरण गेल्या १३ वर्षांपासून न्यायालयात होते. अखेर आज (१८ फेब्रुवारी) त्याचा निकाल सुनावण्यात आला आहे. 

---Advertisement---

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल !

२००२ साली गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. दहशतवाद्यांनी टिफिन बॉक्समध्ये बॉम्ब भरुन ते गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत ठेवले होते. या साखळी बॉम्बस्फोटात एकूण ७८ आरोपी होते. अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने ४९ आरोपींना दोषी ठरवले होते, तर पुराव्या अभावी २८ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायालयाने दोषी ठरवण्यात आलेल्या ४९ पैकी ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादाच्या आरोपात एकाच वेळी ४९ आरोपींना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावण्यासोबतच मृतांच्या वारसांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये, यासोबतच गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये देण्यास सांगितले आहे.

राज्यात पुन्हा बर्ड फ्ल्यूमुळे खळबळ, ३०० कोंबड्या दगावल्या

एमपीएससीची (MPSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles